शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

वैरागड ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार

By admin | Updated: September 9, 2016 01:16 IST

येथील ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांच्या संगणमताने ग्राम निधी,

सीईओंकडे तक्रार : गावकऱ्यांनी केली चौकशीची मागणीवैरागड : येथील ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांच्या संगणमताने ग्राम निधी, १३ वा वित्त आयोग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, १४ वा वित्त आयोग, जिल्हा परिषद व पंचायत समिती निधी, मागास क्षेत्र अनुदान निधीमधून मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असून मजुरांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून स्वत: रक्कमेची उचल केली असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.सन २०१६ मध्ये जून महिन्यात वार्ड क्रमांक ५ मधील कवडू बनकर यांच्या घराजवळील विहिरीचा गाळ उपसण्यात आला. प्रत्यक्षात पाच मजुरांना १ हजार ५०० रूपये मोबदला दिला असताना कामावर असलेल्या व्यक्तींच्या हजेरी पटावर त्यांची मजुरी सात हजार रूपये दाखविली आहे. मजुरांच्या खोट्या सह्या करून त्यांची मजुरी हडप करण्यात आली आहे. ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या एका मर्जीतल्या चपराशाने या सह्या मारल्या आहेत. मागील दीड वर्षात कामावर असलेल्या व्यक्तींच्या प्रत्येक हजेरी पटावर खोट्या सह्या मारल्या आहेत, असे निदर्शनास आले आहे. मागास क्षेत्र विकास निधीतून अंगणवाडी विद्युतीकरणासाठी १ लाख २६ हजार २९४ रूपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. या ठिकाणी साहित्य खरेदीत अनेक खोटी बिले जोडण्यात आली आहेत. लाखो रूपयांचा खर्च दाखवून सुध्दा अंगणवाड्यांमधील विद्युतीकरण गायब झाले आहे. येथील सरपंच, उपसरपंच, ग्राम विकास अधिकारी, मासिक सभेच्या विषय सूचित विषय न ठेवता आपल्या मर्जीतल्या व्यक्तींसाठी ग्रामपंचायतचे ठराव घेतात, असा आरोप निवेदनातून केला आहे. ग्रामविकास अधिकारी सरपंच यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे ग्राम विकास मंत्री, जिल्हाधिकारी मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे केली आहे. सदर तक्रार पांडूरंग बावणकर, वसुधा तावेडे, राजू आकरे, महेंद्र तावेडे, सत्यदास आत्राम, रमेश पगाडे, सावजी धतकर, दिनकर लोते, रामभाऊ नंदरधने, प्रमोदे तावेडे, सुभाष बरडे, अमोल रामटेके, धम्मपती अलोणे, शेंद्रे यांनी केली आहे. (वार्ताहर)