७०८ कोरोना योद्धयांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST2021-02-21T05:00:00+5:302021-02-21T05:00:37+5:30
कोरोनाच्या महामारीतून बचाव करण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीत लढा देणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लस देणे सुरू आहे. अतिशय महाग असलेली ही कोरोना लस याेद्धयांसाठी नि:शुल्क दिली जात आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ जवान, नगरपालिका कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, आशा स्वयंसेविका अशा नागरिकांसोबत प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे.

७०८ कोरोना योद्धयांनी घेतली लस
लोकमत न्युज नेटवर्क
देसाईगंज : ऐच्छिक असलेल्या कोरोना लस घेण्यात देसाईगंज तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कोरोना योध्दे अग्रेसर आहेत. २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात देसाईगंज ग्रामीण रूग्णालयातून ७०८ कोरोना योद्धयांनी कोरोना लस घेतलेली आहे. यात ४४२ पुरूष तर २६६ महिला योध्दांचा समावेश आहे.
कोरोनाच्या महामारीतून बचाव करण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीत लढा देणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लस देणे सुरू आहे. अतिशय महाग असलेली ही कोरोना लस याेद्धयांसाठी नि:शुल्क दिली जात आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ जवान, नगरपालिका कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, आशा स्वयंसेविका अशा नागरिकांसोबत प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. आतापर्यंत एकूण ७०८ कोरोना योध्दांनी लस घेतली आहे. यात ३२८ आरोग्य कर्मचारी असून ३८० इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लसिकरणात पुढे पत्रकार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुध्दा कोराेना लसिकरण करावयाचे आहे. लसीकरणाचा पहिला डोज घेतल्या नंतर २८ दिवसांनी दुसरा डोज घ्यावा लागणार आहे. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. प्रशासन ही माेहीम राबवत आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे लसीकरण सुरू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या टप्प्यांनी कोरोना युध्दात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या प्रत्येकांना लसीकरण होईल. लसीकरणाचा पहिला टप्पा झाल्यांनंतर नचुकता दुसरा डोज घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्कसारख्या प्रतिबंदांत्मक उपायांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
- डाॅ.अभिषेक कुमरे,
तालुका वैद्यकीय अधिकारी