शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

आश्रमशाळेतील पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 1:30 AM

रेगडी येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. येथील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पालकांनी प्रशासनाकडे केली आहे.

ठळक मुद्दे१० कर्मचाऱ्यांचा अभाव : विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : रेगडी येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. येथील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पालकांनी प्रशासनाकडे केली आहे.मागील शैक्षणिक सत्रात ऐन परीक्षाचे तोंडावर एका विद्यार्थिनीचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील प्राचार्य एच. ए. नन्नावरे व अधीक्षक टी. के. आत्राम यांच्या कामाची चौकशी करण्यासाठी शासनाने नन्नावरे व आत्राम यांना मे २०१८ मध्ये निलंबित केले. त्यामुळे रेगडी आश्रम शाळेचा प्रभार शिक्षक गेडाम यांच्याकडे व अधीक्षकाचा प्रभार शिक्षक शेंडे यांच्याकडे देण्यात आला. मागील शैक्षणिक सत्रापासून येथील शिक्षक व अन्य कर्मचाºयांची पदे रिक्त आहेत.शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीमध्ये ४३६ विद्यार्थी आहेत. सध्या प्राचार्य पदाचा प्रभार गेडाम यांच्याकडे व अधीक्षक पदाचा प्रभार शेडे यांच्याकडे आहे. आश्रमशाळेत उच्च माध्यमिक शिक्षकाचे १, प्राथमिक शिक्षक ३, माध्यमिक मुख्याध्यापक १ पद, अधीकक्ष पुरूष १ पद, ग्रंथपाल १ पद, प्रयोग शाळा १ पद, चौकीदार १ पद, सफाई कामगार १ पद व कामाठीचे १ पद असे एकूण १० ते ११ पद रिक्त असून आश्रमशाळा प्रशासनाने मागील व यंदाच्या शैक्षणिक सत्रात येथील रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले. प्रशासनस्तरावर पत्र व्यवहार करण्यात आला. परंतु काहीच उपयोग झाला नाही. तर प्रशासनाने मानधनावर ३ प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली. मात्र उर्वरित महत्त्वाची पदे अजूनही रिक्तच आहेत. शिक्षणावर परिणाम होत आहे.या संदर्भात प्राचार्य गेडाम यांनी आपल्याकडे आठ दिवसांपूर्वी शाळेचा प्रभार सोपविण्यात आला. त्यामुळे रिक्त पदांबाबत काहीही सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण