जिल्हाधिकारी कार्यालयात पदे रिक्त
By Admin | Updated: May 7, 2014 02:17 IST2014-05-07T02:17:04+5:302014-05-07T02:17:04+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग १ चे ५ व वर्ग २ चे १ असे एकूण अधिकार्यांची सहा पदे तसेच वर्ग

जिल्हाधिकारी कार्यालयात पदे रिक्त
अधिकार्यांची सहा पदे : भरण्याची मागणी
गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग १ चे ५ व वर्ग २ चे १ असे एकूण अधिकार्यांची सहा पदे तसेच वर्ग तीनचे १८ आणि वर्ग ४ चे २ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकारी व कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ग १ चे १४ पदे मंजूर आहेत. यापैकी ९ पदे भरण्यात आली असून ५ रिक्त आहेत. वर्ग २ चे १३ मंजूर पदांपैकी १२ पदे भरण्यात आली असून एक पद रिक्त आहे.
वर्ग १ च्या रिक्त पदांमध्ये तहसीलदार, जिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी (सामान्य), सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी या पदांचा समावेश आहे. तसेच वर्ग २ चे रोहयो विभागातील उपअभियंत्याचे पद रिक्त आहे. वर्ग ३ चे एकूण १५६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १३८ पदे भरण्यात आली असून १८ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ चे मंजूर ३६ पदांपैकी ३४ पदे भरण्यात आली असून दोन पदे रिक्त आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे सर्वोच्च जिल्हा प्रशासनाचे ठिकाण आहे. सर्वच शासकीय योजनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयातून होते. जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज कार्यालयीन कामासाठी जिल्हाभरातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. मात्र पुरेशा मनुष्यबळाअभावी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. (स्थानिक प्रतिनिधी)