पाणी काटकसरीने वापरा
By Admin | Updated: January 31, 2015 01:37 IST2015-01-31T01:37:37+5:302015-01-31T01:37:37+5:30
आज जरी पाणी मुबलक उपलब्ध होत असले तरी भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा,

पाणी काटकसरीने वापरा
गडचिरोली : आज जरी पाणी मुबलक उपलब्ध होत असले तरी भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले.
भारत जल सप्ताहअंतर्गत जिल्हास्तरीय ‘हमारा जल हमारा जीवन’ या कार्यशाळेचे आयोजन २९ जानेवारी रोजी करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, कनिष्ठ भूवैज्ञानिक गुजर, रमेश भुरसे, उपविभागीय अभियंता बरडे, पळेगावकर आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना जीवन नाट यांनी भूजल पातळीत वाढ होण्यासाठी बंधारे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा सुद्धा उपलब्ध होते. शासनाने बंधारा बांधकामासाठी व त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केले.
कनिष्ठ भूवैज्ञानिक गुजर यांनी जिल्ह्याची भूरचना, पाणलोट क्षेत्र, विहिरीची खोली, इन्व्हेल बोअर आदी बाबतची माहिती स्लाईटद्वारे सादर केली. प्रास्ताविक लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. ओरके यांनी केले. संचालन रोहयो संवर्ग विकास अधिकारी शालिकराम पडघन तर आभार शाखा अभियंता कुंभारे व दुमपेट्टीवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता घोडमारे, उप कार्यकारी अभियंता दिलीप जोग, घरतकर, झाडे, कंगाले यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यशाळेचा फायदा जलसंधारण कामांचे नियोजन करताना होणार आहे. (नगर प्रतिनिधी)