प्रभावी अध्यापनासाठी कौशल्य वापरा
By Admin | Updated: July 3, 2017 01:14 IST2017-07-03T01:14:23+5:302017-07-03T01:14:23+5:30
जलदगती शिक्षण प्रशिक्षण हे जिल्ह्यातील १ हजार १५८ शिक्षकांना दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर जुलै महिन्यात

प्रभावी अध्यापनासाठी कौशल्य वापरा
अहेरीत शिक्षकांचे प्रशिक्षण : रवींद्र रमतकर यांचे शिक्षकांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : जलदगती शिक्षण प्रशिक्षण हे जिल्ह्यातील १ हजार १५८ शिक्षकांना दिले जाणार आहे. या प्रशिक्षणानंतर जुलै महिन्यात नवीतील विद्यार्थ्यांचे चाचणी घेऊन अप्रगत विद्यार्थी शोधले जातील व त्यांचे गुणवत्तेकरिता एक वेगळा कार्यक्रम शिक्षकांनी तयार करुण अप्रगत विद्यार्थ्यांनी प्रगत केल्या जाईल. या प्रशिक्षणाचा प्रभावी अध्यापनासाठी कौशल्यपूर्ण वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र रमतकर यांनी केले.
डायटचे प्राचार्य डॉ. रमतकर यांनी शनिवारी गटसाधन केंद्र अहेरी येथे आयोजित राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सुरु असलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाला भेट देवून प्रशिक्षण व्यवस्थापनाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते नववी पर्यंत शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण देवून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार करायचे आहे. त्याकरिता शासनाने जलद शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम सुद्धा हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहेरीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची व्यवस्था व इतर सोयी चांगल्या असल्याने प्राचार्य डॉ. रमतकर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी गुणवत्ता कक्षाचे प्रकाश दुर्गे, गट समन्वयक ताराचंद भुरसे, प्रशिक्षण उपक्रम प्रमुख सुषमा खराबे, प्रविणा कांबळे, अशोक कोवे, साधनव्यक्ती अरुण जकोजवार, राजू नागरे, दीपा रामटेके, किशोर मेश्राम, तज्ज्ञ मार्गदर्शक तथा सुलभक प्रशांत नैताम, डी.बी.वट्टे, सी.व्ही. श्रीरामे, लेखापाल तेजू दुर्गे उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा लाभ अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व अहेरी या तालुक्यातील एकूण ८० माध्यमिक शिक्षक लाभ घेत आहेत.