सिमेंट काँक्रिटीकरणात डस्टचा वापर

By Admin | Updated: February 22, 2017 01:59 IST2017-02-22T01:59:50+5:302017-02-22T01:59:50+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या प्रांगणात कंत्राटदाराकडून सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.

Use of dust in cement concretization | सिमेंट काँक्रिटीकरणात डस्टचा वापर

सिमेंट काँक्रिटीकरणात डस्टचा वापर

चौकशीची मागणी : कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या कामातील प्रकार
देसाईगंज : स्थानिक कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या प्रांगणात कंत्राटदाराकडून सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र सदर कामात काळ्या गिट्टीसोबत काळ्या डस्टचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थानिक उपबाजार समितीच्या मैदानावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून जोमात सुरू आहे. या कामासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाकडून बाजार समितीला कोट्यवधीचा निधी कर्जरूपाने प्राप्त झाला आहे. मात्र या कामात कंत्राटदाराकडून काळी गिट्टी व डस्टचा वापर केला जात आहे. मिक्सर मशीनमधून तयार होणाऱ्या काँक्रीटीकरणात गिट्टी सिमेंटचा वापर कमी तर काळी डस्ट व रेतीचा वापर अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. कृऊबासच्या विकासासाठी शासनाने प्रकल्पांतर्गत काम सुरू केले आहे. मात्र या कामाच्या देखरेखीकडे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Use of dust in cement concretization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.