शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

तेंदूपत्ता पलटाईच्या कामात बालमजुरांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 5:00 AM

अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी हे काम आटोपले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे काम झाल्यावर तेंदूपुडे पलटविणे, त्याची योग्यरित्या मांडणी करणे, तसेच त्यावर पाण्याचा वापर करणे आदी कामे करावी लागतात.

ठळक मुद्देसंडे अँकर । अत्यल्प पैसे देऊन कंत्राटदार करीत आहेत लूट; ग्रामसभा व कंत्राटदारांच्या संगनमताने तेंदू संकलन

श्रीधर दुग्गीरालापाठी ।लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : कोरोना संचारबंदीचा फायदा घेत अहेरी तालुक्यातील ग्रामसभा व तेंदूपत्ता कंत्राटदारांनी आपसात संगणमत करून तेंदू मजुरांचे आर्थिक शोषण करीत आहे. याशिवाय तेंदूपुडे पलटाईच्या कामासाठी बाल मजुराचा वापर केला जात आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी हे काम आटोपले आहे. तेंदूपत्ता संकलनाचे काम झाल्यावर तेंदूपुडे पलटविणे, त्याची योग्यरित्या मांडणी करणे, तसेच त्यावर पाण्याचा वापर करणे आदी कामे करावी लागतात. मात्र कमलापूर परिसरात रेपनपल्ली व कमलापूर युनिटमध्ये तेंदूपुडे पलटाईच्या कामासाठी बाल मजुरांचा सर्रास वापर केला जात आहे. त्यांना अत्यल्प मोबदला देऊन त्यांची आर्थिक लूट करीत असल्याचे दिसून येत आहे.बालकांना कामावर ठेवू नये, असा कायदा आहे. मात्र हा कायदा पायदळी तुडवत कंत्राटदार बालकांना कामावर ठेवत आहेत. बालमजुरी विरोधी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या संचारबंदीच्या काळात मजुरांना रोजगार देण्याचा शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र तेंदू हंगामात परिस्थिती याउलट दिसत आहे. १८ वर्ष पूर्ण झालेल्या सज्ञान मजुरांना तेंदू हंगामात काम न देता बालमजुराचा वापर केला जात आहे. १८ वर्ष पूर्ण झालेल्या मजुरांना तेंदूपुडे पलटाईच्या कामास घेतल्यास त्यांना योग्य मोबदला द्यावा लागतो. स्वत:चे पैसे वाचविण्यासाठी कंत्राटदार बालमजुरांना कामावर घेत आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या कुटुंबातील अनेक लहान मुले, मुली तेंदूपुडे पलटाईच्या कामावर जात आहेत. कमलापूर व रेपनपल्ली या दोन्ही युनिटचे काम तेलंगणा येथील दोन कंत्राटदाराने घेतले आहे.सेटिंग पद्धतीने झाला लिलावदरवर्षी प्रमाणे यंदा वृत्तपत्रात रितसर जाहिरात प्रकाशित करून ग्रामसभांनी तेंदू घटकाची लिलाव प्रक्रिया राबविणे बंधनकारक होते. मात्र कोरोनाच्या संचारबंदीचा फायदा घेत अहेरी तालुक्यातील ग्रामसभा व तेलंगणातील तेंदू कंत्राटदारांनी आपसात संगणमत करून सेटिंग पद्धतीने लिलाव प्रक्रिया आटोपून घेतली. तेंदू घटकाचा दर काय, तेंदू संकलन मजुरीचा दर काय, याबाबत मजुरांना व ग्रामस्थांना कुठलीही माहिती नाही. ग्रामसभेचे मोजके पदाधिकारी यात सहभागी आहेत.ग्रामसभांचे लेखा परीक्षण आवश्यककायद्याने वनोपजाची मालकी, व्यवस्थापन व विक्री करण्याचे अधिकार अनुसूचित जमाती क्षेत्रातील ग्रामसभांना आहे. ग्रामकोषच्या माध्यमातून तेंदू व इतर वनोपजाचा व्यवहार ग्रामसभांमार्फत केला जातो. मात्र ग्रामसभांना तेंदू, बांबू व इतर वनोपजाचे व्यवस्थापन व विक्रीच्या माध्यमातून किती नफा झाला, रोजगाराचे प्रमाण काय, निधीचा विनियोग कसा याबाबत ग्रामस्थांमध्ये अनभिज्ञता आहे. त्यामुळे ग्रामसभांचे लेखा परीक्षण होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Socialसामाजिक