पर्यावरणपूरक व आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी बांबूचा उपयाेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:49+5:302021-09-19T04:37:49+5:30

वडसा वनविभाग व महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक बांबू दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ...

Use of bamboo to enhance eco-friendly and economic well-being | पर्यावरणपूरक व आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी बांबूचा उपयाेग

पर्यावरणपूरक व आर्थिक सुबत्ता वाढविण्यासाठी बांबूचा उपयाेग

वडसा वनविभाग व महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक बांबू दिन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी गडचिरोलीचे वनसंरक्षक डाॅ. किशोर मानकर, जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थेचे अध्यक्ष डाॅ. नामदेव उसेंडी, नगराध्यक्ष शालू दंडवते, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक उप वनसंरक्षक मनोज चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक जी.पी. धारणे, प्रास्ताविक सामान्य सुविधा केंद्राचे व्यवस्थापक कांतिलाल गजभिये तर आभार वन परिक्षेत्राधिकारी धांडे यांनी मानले.कार्यक्रमाला परिसरातील बुरड बांधव व शेतकरी उपस्थित होते.

बाॅक्स

जिल्ह्यात बांबूच्या १३० प्रजाती

जगात बांबूच्या एकूण १ हजार ५०० प्रजाती असून यापैकी १३० प्रजाती गडचिरोली जिल्ह्यात आढळून येतात. जागतिक व्यापारात भारताचा फक्त ४ टक्के वाटा असल्याने व बांबू हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे गवती वृक्ष आहे. याची वाहतूक व विक्री करण्याच्या अटीत शिथिलता देण्यात आली आहे. शासनाच्या अटल बांबू समृद्धी योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन तीन वर्षात एकरी ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न देणाऱ्या बांबूची लागवड करुन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन डाॅ.नामदेव उसेंडी यांनी केले.

बाॅक्स

पर्यायी इंधन म्हणून वापर

बांबूची एकदा लागवड केल्यापासून तब्बल ४० वर्षे उत्पादन देणारे बांबू हे शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट करण्यात मौलिक भूमिका बजावू शकतात. या माध्यमातून दरवर्षी ५० हजार कोटींची उलाढाल करणारे गवताळ वृक्ष आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यास सीमित असलेल्या कोळशाला पर्यायी इंधन म्हणून उपयोगात येऊ शकते. त्यामुळे बांबूची जास्तीत जास्त लागवड करणे काळाची गरज असल्याचे डाॅ. किशोर मानकर यांनी सांगितले.

180921\img-20210918-wa0035.jpg

जागतिक बांबु दिवसानिमित्य मार्गदर्शन करतांना आमदार किर्ष्णा गजबे

Web Title: Use of bamboo to enhance eco-friendly and economic well-being

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.