शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही - पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 5:22 AM

नक्षलवाद हा सामाजिक विषय, त्याला विकास हेच उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यात नक्षल कारवाया व त्यांचा प्रभाव कमी झाल्याचे वाटत असले तरी शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सरकारविरूद्ध आकस निर्माण करून स्वत:साठी अनुकूल जनमत तयार करणारा एक वर्ग समाजात सक्रिय आहे. वेळीच काळजी घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकारांशी बोलताना दिला. विदर्भ दौऱ्याअंतर्गत गुरूवारी देसाईगंज येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आटोपून ते गडचिरोलीत आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी तथा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. धर्मरावबाबा आत्राम, उपस्थित होते.

मी मुख्यमंत्री असताना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) माध्यमातून या भागात रस्ते बनविले होते, असे सांगून पवार यांनी दळणवळणाची साधने वाढविण्याची गरज बोलून दाखविली.

शेती व औद्योगिकीरणाला पाठबळ हवेnविकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शेतीचा विकास आणि औद्योगिकरणाला पाठबळ देण्याची गरज आहे. नव्या पिढीमध्ये येत असलेले नैराश्य त्याने घालविता येईल, असे पवार म्हणाले.nसुरजागड लोहखाणीसंदर्भात जे काही गैरसमज आहेत ते चर्चेतून दूर केले पाहिजेत. संबंधित कंपनीच्या मालकांनी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लोकांना समजावून सांगितले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

आम्हाला संघटनेसोबत सरकारही चालवायचे आहेnकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच विदर्भात राष्ट्रवादीचे दुकान बंद होईल, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सोनियाजी दिल्लीत सर्व समविचारी पक्षांनी एकत्र राहावे अशी भूमिका व्यक्त करत असतात. त्याच्याशी सुसंगतपणे आम्ही वागत असतो. nपक्ष वाढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण आम्ही पक्ष चालवत असताना राज्याचे सरकारही चालवायचे आहे याचे भान ठेवतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. 

विकास हेच उत्तरnविकासापासून वंचित असलेल्या समाजघटकाने नक्षलवादाला प्रतिसाद दिला आणि तो फोफावत गेला. त्यामुळे हा सामाजिक-आर्थिक विषय आहे. त्याला विकास हेच उत्तर आहे. विकासात्मक कामातील अडथळे रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी काम करावे, असे पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnaxaliteनक्षलवादी