शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हांड्यात रूग्ण अन् वार्डात बॅटऱ्या

By admin | Updated: September 11, 2014 23:31 IST

रूग्णांना दाखल करून उपचार करावयाच्या वार्डात रूग्णालयाच्या प्रशासनाने बॅटऱ्या ठेवल्या आहेत. तर जागेअभावी येथील रूग्णांना वऱ्हांड्यात दाखल राहून उपचार घ्यावा लागत आहे.

बॅटऱ्या झाल्या निकामी : कोरची ग्रामीण रूग्णालयाचा अजब खाक्याकोरची : रूग्णांना दाखल करून उपचार करावयाच्या वार्डात रूग्णालयाच्या प्रशासनाने बॅटऱ्या ठेवल्या आहेत. तर जागेअभावी येथील रूग्णांना वऱ्हांड्यात दाखल राहून उपचार घ्यावा लागत आहे. असा अजब खाक्या कोरची ग्रामीण रूग्णालयात पहावयास मिळत आहे. यामुळे रूग्णालयातील रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळ्यात रूग्णांची संख्या वाढत असते. सध्या कोरची ग्रामीण रूग्णालयात जवळपास १५० रूग्ण दाखल आहेत. ५० हजार लोकसंख्या असलेल्या कोरची तालुक्याची आरोग्य व्यवस्था एकाच रूग्णालयावर अवलंबून आहे. मे २०१४ ला पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते येथील ग्रामीण रूग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. सुसज्ज इमारत असून या रूग्णालयात अनेक आरोग्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी उद्घाटनाप्रसंगी दिले होते. कोरची ग्रामीण रूग्णालयात ३० खाटांची व्यवस्था असून ३ वार्ड आहेत. यात पुरूष वार्ड, महिला वार्ड व गर्भवती महिला तसेच लहान मुलांचा एक वार्ड आहे. क्रमांक १ च्या पुरूष वार्डामध्ये रूग्णालयाच्या प्रशासनाने बॅटऱ्या ठेवल्या आहेत. त्यामुळे महिलांच्याच वार्डात महिला व पुरूष रूग्णांना दाखल केले जात आहे. मात्र या वार्डातील खाटांची तसेच जागेची कमतरता भासत असल्याने या रूग्णालयातील अनेक रूग्णांना वऱ्हाड्यांत खाटा लावून उपचार केल्या जात आहे. महिन्यातून एकवेळा वार्डाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असते. अशावेळी एक वार्ड रिकामे ठेवणे गरजेचे असते. मात्र दोन्ही वार्डात मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल असल्याने या वार्डाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले नाही. विद्युत पुरवठ्याच्या लपंडावावर मात करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून या बॅटऱ्या जोडण्यात आल्या. मात्र ही जोडणी खराब झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)