अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन रखडले

By Admin | Updated: November 19, 2016 02:05 IST2016-11-19T02:05:17+5:302016-11-19T02:05:17+5:30

पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १८ अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन मागील अनेक महिन्यांपासून झाले नाही.

Untrained teacher's salary stops | अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन रखडले

अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन रखडले

आर्थिक अडचण वाढली : जिल्हा परिषदेकडे अनुदान प्राप्त
धानोरा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १८ अप्रशिक्षित शिक्षकांचे वेतन मागील अनेक महिन्यांपासून झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अप्रशिक्षित शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत.
धानोरा पंचायत समितीमधील शिक्षण विभागाचा गलथान कारभार संपूर्ण जिल्ह्यात कुप्रसिध्द आहे. येथील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षकांचे वेतन दोन ते तीन महिने होत नाही. धानोरा पंचायत समिती अंतर्गत एकूण १८ अप्रशिक्षित शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनाचे अनुदान जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. मात्र त्याचे वितरण अजुनपर्यंत शिक्षकांना करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून वेतन देण्यासाठी हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. १५ दिवसांपूर्वी धानोरा तालुक्यातील शिक्षक संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तरी समस्या सुटल्या नाहीत.

Web Title: Untrained teacher's salary stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.