चामोर्शीत रेतीची अवैैध तस्करी
By Admin | Updated: April 8, 2017 01:53 IST2017-04-08T01:53:48+5:302017-04-08T01:53:48+5:30
तालुक्यात अनेक नदीघाट आहेत. सर्व नदीघाटांचा लिलाव न झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैैध तस्करी होत आहे.

चामोर्शीत रेतीची अवैैध तस्करी
घाटांचा लिलाव रखडला : तालुक्यात अनेक ठिकाणी खनन जोमात
चामोर्शी : तालुक्यात अनेक नदीघाट आहेत. सर्व नदीघाटांचा लिलाव न झाल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैैध तस्करी होत आहे. लिलाव न झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य रेती खनन होत आहे. परिणामी शासनाचा महसूल बुडत आहे.
चामोर्शी तालुक्यात अनेक नदीघाट आहेत. या घाटांवर उच्च प्रतिची वाळू मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व नदीघाटांचा लिलाव न झाला नाही. ज्या नदीघाटांचा लिलाव झाला नाही. त्या ठिकाणी रेतीची अवैैध तस्करी होत आहे. तसेच ज्या नदीघाटाचा लिलाव झाला तेथील ठेकेदार नियमबाह्यपणे रेती खनन करून अवैैधरीत्या उचल करीत आहेत. प्रशासनाने कठोर कारवाई करून रेतीचे अवैैध खनन व अवैैध वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे. चामोर्शी तालुक्यात हरणघाट, वाघोली, दोटकुली, तळोधी, कुरूळ, बोरघाट, आमगाव, मुरमुरी, जोगणा, मोहोर्ली, गणपूर असे अनेक मोठे नदीघाट आहेत. बोरघाट व मुरमुरी हे दोन घाट वन विभागांतर्गत येतात. या घाटांचा लिलाव वन विभागाकडे असला तरी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लिलाव केला जातो. यावर्षी या दोन घाटाशिवाय इतरही घाटांचा लिलाव न झाल्याने येथून अनेकजण रेतीचे अवैैध उत्खनन करून रेतीची वाहतूक करीत आहेत. तालुक्यातील अवैध उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
सीमांकनाबाहेरही मोठ्या प्रमाणावर उत्खनन
ज्या नदीघाटांचा लिलाव झाला. त्या नदीघाटावर देखील आखून दिलेल्या सीमांकनाच्या बाहेर खनन करून रेती उपसली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात सहावेळा लिलाव झाल्याची माहिती आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यात केवळ तीन वेळा लिलाव झाल्यामुळे उर्वरित घाट शिल्लक आहेत. या घाटांवर अवैैधरीत्या रेती खनन करून मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात आहे. प्रशासनाने अवैैध रेती तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.