लिंकअभावी व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 05:00 IST2020-10-16T05:00:00+5:302020-10-16T05:00:30+5:30
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ग्राहकांची खाती आहेत. शेतकऱ्यांना व नागरिकांना विविध कामासाठी पैशाची आवश्यकता असते. ही गरज भागविण्यासाठी ते बँकेत येतात. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांकडे एटीएम नसल्याने ते प्रत्यक्ष बँकेत येऊन पैसे काढतात. सिरोंचा येथे कोकण ग्रामीण बँके व्यतिरिक्त बँक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. दोन्ही बँकांमध्ये आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

लिंकअभावी व्यवहार ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुका मुख्यालयी असलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील लिंक गेल्या चार दिवसांपासून फेल असल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेच्या प्रवेशद्वारासमोर लिंक फेलचे फलक लावल्याने ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांना आल्या पावली परतावे लागत आहे. यात त्यांना बराच त्रास होत आहे.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ग्राहकांची खाती आहेत. शेतकऱ्यांना व नागरिकांना विविध कामासाठी पैशाची आवश्यकता असते. ही गरज भागविण्यासाठी ते बँकेत येतात. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांकडे एटीएम नसल्याने ते प्रत्यक्ष बँकेत येऊन पैसे काढतात. सिरोंचा येथे कोकण ग्रामीण बँके व्यतिरिक्त बँक ऑफ इंडिया व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. दोन्ही बँकांमध्ये आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. परंतु विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत लिंक फेल असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांना पैशाची अत्यंत आवश्यकता असतानाही त्यांना आल्यापावली परतावे लागते. विशेष म्हणजे तालुक्याच्या ६० ते ७० किमी अंतरावरून येणारे ग्राहक परत जातात. यात त्यांना बराच मानसिक व शारीरिक त्रास होतो.
पासबुक प्रिंटिंग मशीनही बंदच
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून जून, जुलै महिन्यापर्यंत पासबुक प्रिंटिंग मशीन बंद ठेवण्यात आल्या. त्यानंतर मशीन सुरू झाल्या. परंतु सिरोंचा येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील पासबुक प्रिंटिंग मशीन नादुरूस्त असल्याने ग्राहकांना पासबुकातील नोंदी घेता येत नाही. नादुरूस्त असलेली मशीन दुरूस्त करावी अथवा त्याजागी नवीन मशीन उपलब्ध करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. परंतु या मागणीकडे सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.