विद्यापीठ विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही
By Admin | Updated: September 14, 2015 01:10 IST2015-09-14T01:10:17+5:302015-09-14T01:10:17+5:30
गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील प्रगत व अग्रणी विद्यापीठ ठरावे, यासाठी नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी प्रयत्न करावे.

विद्यापीठ विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही
नव्या कुलगुरूंनी घेतली भेट : सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
गडचिरोली : गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील प्रगत व अग्रणी विद्यापीठ ठरावे, यासाठी नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी प्रयत्न करावे. गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विद्यापीठाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वन व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांना दिली.
गोंडवाना विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी १२ सप्टेंबर रोजी शनिवारला राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. यावेळी नामदार मुनगंटीवार यांनी कुलगुरू डॉ. कल्याणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच विद्यापीठाच्या कामासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. याप्रसंगी नामदार मुनगंटीवार व कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्यात गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगती व विकासाबाबत विस्तृत चर्चा झाली.
दरम्यान, कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी विद्यापीठाचा नावलौकीक करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू, असे यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)