विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 01:10 IST2018-01-24T01:05:57+5:302018-01-24T01:10:08+5:30

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुण व कौशल्यांना वाव मिळण्यासाठी या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा महोत्सवातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.

Universal development of students | विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा

ठळक मुद्दे कुलगुरूंचे प्रतिपादन : शिवाजी महाविद्यालयात युवा महोत्सवाचे उद्घाटन थाटात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुण व कौशल्यांना वाव मिळण्यासाठी या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा महोत्सवातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक शिवाजी महाविद्यालयात मंगळवारी आयोजित युवा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष के. के. भोयर, सहसचिव डी. एन. चापले, विद्यापीठ प्रतिनिधी आशिष स्वामी, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी रमेश पेरगु, प्राचार्य डॉ. बी. एस. चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. बी. एस. चिकटे यांनी प्रास्ताविकेततून दोन दिवशीय युवा महोत्सवामध्ये होणारे कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांविषयी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी अनिल म्हशाखेत्री, के. के. भोयर, डी. एन. चापले यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रेवनदास शेडमाके यांनी केले तर आभार प्रा. के. आर. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व वरिष्ठ प्राध्यापक, एमसीव्हीसी विभागाचे प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, अंशकालीन प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

Web Title: Universal development of students