अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस गंभीर

By Admin | Updated: July 30, 2016 01:44 IST2016-07-30T01:44:36+5:302016-07-30T01:44:36+5:30

कुरखेडा-देसाईगंज या मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तडस गंभीर जखमी झाल्याची घटना विद्यानगर येथे गुरूवारी रात्री ...

An unidentified vehicle may face serious threats | अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस गंभीर

अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस गंभीर

कुरखेडातील घटना : उपचार सुरू
कुरखेडा : कुरखेडा-देसाईगंज या मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तडस गंभीर जखमी झाल्याची घटना विद्यानगर येथे गुरूवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. सदर जखमी तडसावर वन विभागाच्या कार्यालयात उपचार सुरू आहे.
अंदाजे एक वर्ष वय असलेला नर तडस विद्यानगर-देसाईगंज मार्गावर जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती भाजपचे कुरखेडा तालुका अध्यक्ष राम लांजेवार यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन सदर माहिती भ्रमणध्वनीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. लागलीच वनक्षेत्र सहायक एस. बी. कायते, वन आगार प्रमुख मल्लेलवार, वनरक्षक माणिक राऊत व सपना वालदे यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून जखमी तडसाला पशुचिकित्सालयात आणले. येथे पशुचिकित्सक डॉ. सोनार यांनी जखमी तडसावर उपचार केला. तडसाच्या मागील डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून पाय मोडला आहे. सध्या जखमी तडसाला वन कार्यालयात पशुचिकित्सकाच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे.
व्याघ्र दिवस राज्यभर साजरा होत असताना गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी ही घटना घडल्याने वन विभागातील अधिकाऱ्यांनाही अडचण निर्माण झाली. दोन दिवसापूर्वी आष्टी भागातही दोन हरीणींचा मृत्यू झाला. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: An unidentified vehicle may face serious threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.