गोंदिया-बल्लारशा लोकल ट्रेन पूर्ववत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:43 IST2021-09-14T04:43:32+5:302021-09-14T04:43:32+5:30
मागील दीड वर्षापासून अनेक लोकल व प्रवासी गाड्या रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत. इतर विशेष प्रकारच्या ९० टक्के रेल्वे ...

गोंदिया-बल्लारशा लोकल ट्रेन पूर्ववत सुरू करा
मागील दीड वर्षापासून अनेक लोकल व प्रवासी गाड्या रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत. इतर विशेष प्रकारच्या ९० टक्के रेल्वे गाड्या सरकारने सुरू केल्या आहेत. गोंदिया, बल्लारशा, चंद्रपूर लोकल ट्रेन बंद असल्याने गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. हाेणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व राज्य सचिव मंडळ सदस्य शिवकुमार गणवीर, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार, हौंसलाल राहांगडाले, राज्य कौन्सिल सदस्य माधराव बांते, सदानंद इलमे, विनोद झोडगे, गडचिरोली जिल्हा सचिव देवराव चवळे, गडचिरोली जिल्हा सहसचिव ॲड. जगदीश मेश्राम आदी करणार आहेत.