अनियंत्रित कार उलटून युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:38 IST2019-01-14T22:37:53+5:302019-01-14T22:38:16+5:30
भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास गोठणगाव-चांदागड रस्त्यावर घडली. चालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातात प्रल्हाद भास्कर उसेंडी रा. देवखडकी ता. आरमोरी असे मृतकाच नाव आहे. भास्कर हा कुरखेडा येथील व्यावसायिक बालकिसन भट्टड यांच्याकडे कामाला होता. शेतकऱ्यांना लघुपट दाखविण्याचे कंत्राट भट्टड यांच्याकडे आहे.

अनियंत्रित कार उलटून युवक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास गोठणगाव-चांदागड रस्त्यावर घडली. चालक घटनास्थळावरून फरार झाला.
अपघातात प्रल्हाद भास्कर उसेंडी रा. देवखडकी ता. आरमोरी असे मृतकाच नाव आहे. भास्कर हा कुरखेडा येथील व्यावसायिक बालकिसन भट्टड यांच्याकडे कामाला होता. शेतकऱ्यांना लघुपट दाखविण्याचे कंत्राट भट्टड यांच्याकडे आहे.
याच कामाकरिता त्याच्या वाहनावरील चालक संजय केवळराम दर्रो व मृतक प्रल्हाद उसेंडी हे दोघे पेंढरी हद्दीतील दुर्गापूर येथे गेले होते. तिथून रात्री परत येत असताना कुरखेडापासून सहा किमी अंतरावरच्या गोठणगाव ते चांदागड दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात वाहनाचे चांगलेच नुकसान झाले.
या अपघातात प्रल्हाद हा गंभीर जखमी झाला. त्याला कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार झाला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक प्रशांत रेळेकर चालकाचा शोध घेत आहेत.
कारला अपघात
कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजुला जाऊन धडकली. सदर घटना आलापल्ली-एटापल्ली मार्गावर आलापल्लीपासून पाच किमी अंतरावर घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारचा अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी कार चालक व इतरांना बाहेर काढले.