चंद्रपूरसाठी विनावाहक बसेस सुरू होणार
By Admin | Updated: August 12, 2016 00:54 IST2016-08-12T00:54:37+5:302016-08-12T00:54:37+5:30
गडचिरोली आगाराच्या वतीने १६ आॅगस्टपासून गडचिरोली स्थानकावरून चंद्रपूरसाठी विनावाहक बसफेऱ्या दर अर्ध्या तासाने सोडल्या जाणार आहेत.

चंद्रपूरसाठी विनावाहक बसेस सुरू होणार
गडचिरोली : गडचिरोली आगाराच्या वतीने १६ आॅगस्टपासून गडचिरोली स्थानकावरून चंद्रपूरसाठी विनावाहक बसफेऱ्या दर अर्ध्या तासाने सोडल्या जाणार आहेत. या बसेसला केवळ मूल येथे थांबा दिला जाणार आहे.
गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावरून दरदिवशी १ हजार ५०० प्रवाशी व ५०० विद्यार्थी प्रवास करतात. प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी व प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने गडचिरोली-चंद्रपूर या मार्गावर एसटीच्या विनावाहक बसफेऱ्या सुरू होणार आहेत. सदर बसफेऱ्या दर अर्ध्या तासाच्या अंतराने सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत सोडण्यात येतील. दिवसभरात २४ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. बसस्थानक, महिला रूग्णालय, फुटका देऊळ, कॉम्प्लेक्स मार्गावर प्रवाशांची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र वाहक ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर मूल बसस्थानकावरही वाहक प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देतील. मध्यंतरीच्या थांब्यावरील प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी या थांब्यांकरिता वाहक असलेल्या सर्वसाधारण बसेस सोडण्यात येतील. या नवीन उपक्रमामुळे प्रवाशांची वेळेची बचत होण्यास फार मोठी मदत होणार आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी निलेश बेलसरे यांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)