आलापल्लीत २४ लाखांचे अनधिकृत बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST2021-06-05T04:26:32+5:302021-06-05T04:26:32+5:30
अहेरी तालुक्यात जनुकीय सुधारित बियाणे मान्यता समितीची मान्यता नसलेले अनधिकृत एचटीबीटी बियाणांची विक्री वाढली आहे. आलापल्ली येथील तुकाराम पेरगुवार ...

आलापल्लीत २४ लाखांचे अनधिकृत बियाणे जप्त
अहेरी तालुक्यात जनुकीय सुधारित बियाणे मान्यता समितीची मान्यता नसलेले अनधिकृत एचटीबीटी बियाणांची विक्री वाढली आहे. आलापल्ली येथील तुकाराम पेरगुवार याच्या घरी असलेल्या गाेदामात अनधिकृत बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली. त्यानुसार कृषी विभाग व पाेलीस विभागाने धाड टाकली. गाेदामात २ हजार २७० पाकिटे कापूस बियाणे व ३५० किलाे खुले बियाणे आढळून आले. शासकीय दराने त्यांची किंमत २३ लाख ६४ हजार ४७२ रुपये हाेते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बियाणांचे निरीक्षण केले असता, एकाही पाॅकिटावर परवाना, प्लाॅट क्रमांक, दिनांक यांचा उल्लेख आढळून आला नाही. त्यानुसार तुकाराम पेरगुवार, त्याचा जावई दामाेधर झाडे व ज्याने बियाणांचा पुरवठा केला, त्याच्याविराेधात भादंवि कलम ४२०, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, कृषी अधिकारी प्रदीप राऊत, कृषी सहायक किरंगे, काेवासे, सहायक पाेलीस निरीक्षक शिंदे, पाेलीस उपनिरीक्षक शेडगे यांच्या पथकाने केली आहे.