स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:25 IST2021-07-20T04:25:11+5:302021-07-20T04:25:11+5:30
रवींद्र तुकाराम नेवारे (२६ वर्ष, रा.रेगडी) असे अपघातातील मृत युवकाचे नाव आहे. तो आपल्या दुचाकीने (एमएच ३३, एक्स ६९५०) ...

स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार
रवींद्र तुकाराम नेवारे (२६ वर्ष, रा.रेगडी) असे अपघातातील मृत युवकाचे नाव आहे. तो आपल्या दुचाकीने (एमएच ३३, एक्स ६९५०) शेतातून रेगडी येथे घरी जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओने (एमएम ४६, झेड १०५५) त्याला जबर धडक दिली. त्या वाहनावर ‘महाराष्ट्र आरोग्य सेवा’ असे लिहिले होते. ती गाडी एटापल्लीवरून रेगडी, घोट मार्गाने गडचिरोलीकडे जात होती. रेगडीपासून तीन किलोमीटरवर हा अपघात झाला. पुढील तपास रेगडी पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश मगरे व एन. बी. शिंब्रे करीत आहेत.
(बॉक्स)
उन्हाळ्यात झाले होते लग्न
रेडगी येथील युवक रवींद्र नेवारे याचे या उन्हाळ्यातच लग्न झाले होते. शेती करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पण संसार फुलण्याआधीच काळाने त्याच्यावर झडप घातली. त्यामुळे त्याच्या पत्नीसह सर्व कुटुंबीयावर आभाळ कोसळले आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.
190721\202-img-20210719-wa0002.jpg
अपघाता दरम्यान मोटारसायकल व स्कारपीओ