देसाईगंज येथे दुचाकी चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:38 IST2021-07-30T04:38:29+5:302021-07-30T04:38:29+5:30

बाजारवाडी येथील मोबाइल दुकानाच्या खाली व नगर परिषद मार्गावर कडेला ठेवलेली जगेंद झिंगर मुळे (रा.नैनपुर देसाईगंज) यांची दुचाकी (एमएच ...

Two-wheeler thief arrested at Desaiganj | देसाईगंज येथे दुचाकी चोरट्यास अटक

देसाईगंज येथे दुचाकी चोरट्यास अटक

बाजारवाडी येथील मोबाइल दुकानाच्या खाली व नगर परिषद मार्गावर कडेला ठेवलेली जगेंद झिंगर मुळे (रा.नैनपुर देसाईगंज) यांची दुचाकी (एमएच ३४/ एजे ६३३९) चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी केली होती. यातील आरोपी अनिल संपत शिवरकर (३४, रा.आंबेडकर वॉर्ड, देसाईगंज) याला अटक करण्यात आली.

याशिवाय दारूबंदी कायद्याअंतर्गत केलेल्या कारवायांमध्ये देशी दारू मंत्री टायगर अँड कंपनीच्या छोट्या निप जप्त करून आरोपी देवाजी रामजी गोंडाने (५४, रा.तुळशी) याला अटक केली. दुसऱ्या कारवाईत एका महिला आरोपीकडून देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. तसेच आरोपी लोकचंद अंबादास उई (४९, रा.कोरेगाव) याच्याकडून ३२ नग देशी दारूच्या निप जप्त केल्या. त्याचप्रमाणे आरोपी नीलेश घनश्याम कावळे (रा.विश वॉर्ड) आणि आरोपी निर्मलसिंग प्रेमसिंग मक्कड (रा.गांधी वॉर्ड), देसाईगंज यांच्यावरही दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

Web Title: Two-wheeler thief arrested at Desaiganj