रस्त्यावरील खड्डे चुकविताना दोन ट्रक भिडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:19 IST2021-09-02T05:19:29+5:302021-09-02T05:19:29+5:30
कुरखेडा : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दोन ट्रक समोरासमोर एकमेकांना घासत जाऊन दोन वेगवेगळ्या बाजूला जाऊन कोसळले. या अपघातात ...

रस्त्यावरील खड्डे चुकविताना दोन ट्रक भिडले
कुरखेडा : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात दोन ट्रक समोरासमोर एकमेकांना घासत जाऊन दोन वेगवेगळ्या बाजूला जाऊन कोसळले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. कुरखेडा-कढोली मार्गावरील घाटी गावाजवळ बुधवारी सकाळी हा अपघात घडला.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात आंतरराज्यीय जड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पण संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यातून दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. बुधवारी सकाळी छत्तीसगड येथून तेलंगणा राज्याकडे लोखंडी तार घेऊन जाणारा ट्रक (एपी ०३ टीई ९५६६) आणि गडचिरोली वरून छत्तीसगडकडे जाणारा ट्रक (सीजी २५ ई २४३६) हे एकमेकांच्या विरूद्ध दिशेने येत होते. दरम्यान रस्त्यावरील खड्डे चुकविताना ट्रकचे पल्ले एकमेकांना जोराने घासले गेल्याने दोन्ही ट्रक अनियंत्रित होऊन रस्त्याचा कडेला जाऊन कोसळले.
(बॉक्स)
टँकमधील डिझेल गेले वाया
यावेळी एका ट्रकच्या डिझेल टँकमध्ये लोखंडी सळाखी आरपार गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल वाहून गेले. दोन्ही वाहनांचे या अपघातात मोठे नुकसान झाले. चालकांच्या प्रसंगावधानाने ते ट्रकखाली दबल्या गेले नाही. या घटनेची नोंद कुरखेडा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
010921\screenshot_2021-09-01-14-58-35-86.png
घाटी अनियंत्रित होत रस्त्याचा कडेला उतरलेला ट्रक