लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरीपासून १७ किमी अंतरावर असलेल्या तलवाडा गावानजीक मद्यपी ट्रकचालकाने विरूद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या अपघातात दोघेही जण जागीच ठार झाले. ही घटना गुरूवारी दुपारी १२.३० ते १ वाजताच्या सुमारास घडली.आलोक अरविंद रॉय (२७) रा.गोविंदपूर नं. १४ व शिवनाथ रावजी सिडाम (४०) रा. इत्तलचेरू अशी ठार झालेल्या इसमांची नावे आहेत. एमएच-३४-ए-३७७७ क्रमांकाचा ट्रक भामरागडकडून अहेरीकडे येत होता. तसेच एमएच-३३-के-११६८ क्रमांकाच्या दुचाकीने आलोक रॉय व शिवनाथ सिडाम हे दोघेजण आलापल्लीवरून ताडगावकडे मिस्त्री कामासाठी जात होते. दरम्यान तलवाडा गावानजीक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला आहे. दोन्ही मृतांना अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश होडगर, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी घटनास्थळ गाठले. या घटनेचा तपास सुरू आहे.ट्रकचालक दारूच्या नशेत होता अशी माहिती आहे. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. मृतकांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात एकच हंबरडा फोडला. ट्रकचालकाला तत्काळ अटक करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
भरधाव ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:59 IST
अहेरीपासून १७ किमी अंतरावर असलेल्या तलवाडा गावानजीक मद्यपी ट्रकचालकाने विरूद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या अपघातात दोघेही जण जागीच ठार झाले.
भरधाव ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार
ठळक मुद्देट्रकचालक फरार : तलवाडा गावानजीकची घटना