पुरात अडकलेल्या दोघांना वाचविले
By Admin | Updated: July 13, 2016 02:10 IST2016-07-13T02:10:43+5:302016-07-13T02:10:43+5:30
पुराच्या पाण्यात अडकलेल्या वाकडी येथील बापलेकांना पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी

पुरात अडकलेल्या दोघांना वाचविले
वाकडीत पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांची कामगिरी
गडचिरोली : पुराच्या पाण्यात अडकलेल्या वाकडी येथील बापलेकांना पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त अभियान राबवून त्यांचे प्राण वाचविले. सदर घटना मंगळवारी घडली.
सरदारसिंग बिरासाय नरोटे (६०), किसन सरदारसिंग नरोटे (४०) दोघेही रा. वाकडी असे पुरातून बाहेर काढलेल्या व्यक्तींची नावे आहेत. सरदारसिंग नरोटे यांची शेतात झोपडी आहे. मंगळवारच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे कृपाळा नदीला पूर आला. पुराचे पाणी झोपडीच्या सभोवताल गोळा झाले. ही बाब फोनद्वारे तहसीलदार दयाराम भोयर यांना कळविण्यात आली. त्यांनी तत्काळ पोलीस व महसूल विभागाच्या बचाव पथकाला घेऊन घटनास्थळा गाठले. नावेच्या सहाय्याने दोघेही बापलेकांना सायंकाळी ६ वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले व त्यांना घरी पोहोचविण्यात आले.