दोन एसआरपीएफ कर्मचारी जखमी
By Admin | Updated: January 31, 2017 02:12 IST2017-01-31T02:12:14+5:302017-01-31T02:12:14+5:30
तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्रातील राज्य राखीव पोलीस दलाचे दोन कर्मचारी स्वयंपाक करीत

दोन एसआरपीएफ कर्मचारी जखमी
बुर्गी येथील घटना : स्वयंपाक करताना कुकरचे झाकण उडाले
एटापल्ली : तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्रातील राज्य राखीव पोलीस दलाचे दोन कर्मचारी स्वयंपाक करीत असताना कुकरचे झाकन उडाल्याने ते गंभीररित्या भाजल्याची घटना सोमवारी दुपारी १ वाजता घडली.
बुर्गी पोलीस मदत केंद्रांतर्गत कार्यरत सीआरपीएफ कर्मचारी जितेंद्र बोरूडे (२१), संदीप यादव (२७) हे दोघे स्वयंपाक करीत होते. ११ लिटरच्या कुकरमध्ये तुरीची डाळ शिजविण्यासाठी ठेवण्यात आली होती. गॅस बंद करून लगेच कुकरचे झाकन काढले. कुकरचे झाकन व गरम डाळ जितेंद्र यांच्या छातीवर पडली. त्यात ते भाजल्या गेले. त्यांचे सहकारी संदीप हे सुध्दा या घटनेत भाजले. त्यांच्यावर एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी शहरातील रूग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)