दुचाकी अपघातात दोन गंभीर

By Admin | Updated: February 7, 2016 02:20 IST2016-02-07T02:19:03+5:302016-02-07T02:20:14+5:30

सोडेकडून धानोराकडे येत असताना धानोरा टोलाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाच्या खोडाला दुचाकीने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी

Two serious in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात दोन गंभीर

दुचाकी अपघातात दोन गंभीर


धानोराजवळील घटना : झाडाच्या खोडाला दुचाकीची धडक

धानोरा : सोडेकडून धानोराकडे येत असताना धानोरा टोलाजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाच्या खोडाला दुचाकीने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रफुल्ल सिध्दार्थ सहारे (२३), अक्षय हरिदास सेडमाके (२४) रा. धानोरा अशी जखमींची नावे आहेत. प्रफुल्ल सहारे व सेडमाके हे एमएच ३३ डी ३३६९ या दुचाकीने सोडेकडून धानोराकडे येत होते. दरम्यान दुचाकी वाहनावरील दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीने झाडाच्या खोडाला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रफुल्ल व अक्षय दोघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना सर्वप्रथम ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात घडला. त्यावेळी वाहन दोघापैकी नेमका कोण चालवीत होता, हे अजूनपर्यंत कळले नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two serious in a two-wheeler accident