नक्षलवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस जवान शहीद, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:18 IST2020-08-14T12:00:08+5:302020-08-14T18:18:13+5:30
भामरागड उपविभागातील कोठी येथील पोलीस मदत केंद्राच्या दोन जवानांवर नक्षवाद्यांनी गोळीबार केल्याने एक पोलीस जवान शहीद झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी कोठी गावात घडली.

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस जवान शहीद, एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भामरागड उपविभागातील कोठी येथील पोलीस मदत केंद्राच्या दोन जवानांवर नक्षवाद्यांनी गोळीबार केल्याने एक पोलीस जवान शहीद झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी कोठी गावात घडली.
प्राप्त माहितीनुसार दोन पोलीस जवान कोठीच्या बाजारात किराणा साहित्य खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे रायफलही नव्हती. याच संधीचा फायदा घेत साध्या वेषातील दोन नक्षवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दुशांत नंदेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला तर दिनेश भोसले यांच्यावर गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू आहेत.