देसाईगंजच्या अपघातात दोन जण जागीच ठार
By Admin | Updated: February 17, 2016 01:05 IST2016-02-17T01:05:39+5:302016-02-17T01:05:39+5:30
देसाईगंज-आरमोरी राज्य महामार्गावर शासकीय विश्रामगृहासमोरील वळणावर मोटार सायकलला अज्ञात वाहनाने जबर

देसाईगंजच्या अपघातात दोन जण जागीच ठार
देसाईगंज : देसाईगंज-आरमोरी राज्य महामार्गावर शासकीय विश्रामगृहासमोरील वळणावर मोटार सायकलला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने यात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजता देसाईगंज येथे घडली.
मोटारसायकल एमएच ३५ वाय ५२८४ या दुचाकीने आरमोरी-वडसा मार्गावरून सदाशिव दोडकुजी बुराडे (५०) रा. इटखेडा जि. गोंदिया यांच्यासह आणखी एक ५० वर्षीय इसम चालले होते. त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दोघांच्याही डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने मेंदू बाहेर येऊन रक्ताचा सळा रस्त्यावर पडला होता. घटनास्थळावरून अज्ञात वाहनचालक पसार झाला. चार दिवसांपूर्वी शहरात बसस्थानकावर एका ट्रकने वन विभागातील कर्मचारी अकबर पठाण यांनाही धडक दिली. त्यात त्यांनाही आपला जीव गमवावा लागला होता. (तालुका प्रतिनिधी)
४सतत अपघात होत असल्याने या मुख्य राज्य मार्गावर राहणारी वर्दळ व रस्त्याच्या दुतर्फा उभी राहणारी वाहने यामुळे फार कमी जागा रहदारीसाठी मिळते. येथील बसस्थानक तत्काळ स्थानांतरित करावे व रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनावर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.