सिरकोंडा जंगलात दोन लाखांचे सागवान जप्त
By Admin | Updated: April 14, 2015 01:54 IST2015-04-14T01:54:23+5:302015-04-14T01:54:23+5:30
बामणी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गंगनूर सिरकोंडा जंगलात सात मोठे सागवान लठ्ठे सोमवारी सकाळी ११ वाजता जप्त

सिरकोंडा जंगलात दोन लाखांचे सागवान जप्त
बामणी वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गंगनूर सिरकोंडा जंगलात सात मोठे सागवान लठ्ठे सोमवारी सकाळी ११ वाजता जप्त करण्यात आले. या प्रकरणात आरोपी फरार झाले असून चार घनमीटर आकाराच्या या सागवानाची किंमत दोन लाख रूपये असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. रोमपल्लीचे क्षेत्रसहायक पी. के. परसा, सिरकोंडाचे क्षेत्रसहायक दंडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक के. टी. कुडमेथे, के. आर. चौधरी, एम. के. पेरके, सचिन बोंडे, वनमजूर आदींनी ही कारवाई पार पाडली.