रानडुकराच्या हल्ल्यात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 01:15 IST2017-05-17T01:15:08+5:302017-05-17T01:15:08+5:30
आलापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या मलमपल्ली जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी

रानडुकराच्या हल्ल्यात दोघे जखमी
मलमपल्लीतील घटना : मदतीची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या मलमपल्ली जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या दोघांवर रानडुकराने हल्ला केल्याने दोघेही जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.
शोभा रघुनाथ लालम (१८) रा. बुर्क मलमपल्ली, चेत्रा पापय्या सडमेक (४५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सोबत असलेले सरोजा साईनाथ आलाम, ताराबाई ईश्वर सिडाम, डॉ. सुरेश सिडाम यांनी आरडाओरड केल्यानंतर रानडुकराने जंगलात पळ काढला. सदर माहिती अहेरी वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्राधिकारी प्रभाकर आत्राम यांना देण्यात आली. वन विभागाच्या चमुने जखमींची भेट देऊन तक्रार नोंदवून घेतली. वन विभागाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जखमींच्या नातेवाईकाने केली आहे.