चाकू व ब्लेडने वार केल्याने दोन जखमी
By Admin | Updated: October 25, 2015 01:21 IST2015-10-25T01:21:44+5:302015-10-25T01:21:44+5:30
दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचत असताना दोघांमध्ये भांडण होऊन त्यातील एकाने चाकू व ब्लेडने वार केल्याने

चाकू व ब्लेडने वार केल्याने दोन जखमी
चामोर्शीतील घटना : दुर्गा विसर्जन मिरवणुकीत घडला प्रकार
चामोर्शी : दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचत असताना दोघांमध्ये भांडण होऊन त्यातील एकाने चाकू व ब्लेडने वार केल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना चामोर्शी येथे वाळवंटी चौकात शुक्रवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
जगदिश सोमेश्वर आत्राम (२०), पंकज माणिकचंद कोहळे (२१) दोघेही रा. चामोर्शी असे जखमींची नावे आहे. या प्रकरणी चामोर्शी पोलिसांनी मुन्ना तुळशीराम मेश्राम (२७), संघशील रा. चामोर्शी व एका अज्ञात आरोपींवर भादंविचे कलम ३२४, ५५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुन्ना मेश्राम याला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गणेश लोणारकर करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)