रानडुकरांची शिकार करणाऱ्या दोघांना अटक
By Admin | Updated: October 17, 2016 02:05 IST2016-10-17T02:05:53+5:302016-10-17T02:05:53+5:30
रानडुकराची शिकार करुन त्याचे मांस विकायला निघालेल्या देवनगर येथील दोन जणांना मुलचेरा येथील वनकर्मचाऱ्यांनी अटक केली.

रानडुकरांची शिकार करणाऱ्या दोघांना अटक
मुलचेरा : रानडुकराची शिकार करुन त्याचे मांस विकायला निघालेल्या देवनगर येथील दोन जणांना मुलचेरा येथील वनकर्मचाऱ्यांनी अटक केली. कार्तिक शंकर सरकार व मनोज अनंत डाली अशी आरोपींची नावे आहेत.
शनिवारी दुपारी देवनगर येथे कार्तिक शंकर सरकार हा रानडुकराची शिकार करून त्याचे मांस विकायला निघाला होता. मात्र, या बाबतची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे रानडुकराचे ५ किलो मांस आढळून आले. वनकर्मचाऱ्यांनी कार्तिक व त्याचा सहकारी मनोज अनंत डाली या दोघांना अटक केली. पंकज विनय मलिक हा अद्यापही फरार आहे.
दोन्ही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, वनपरिक्षेत्राधिकारी व्ही. व्ही. मेडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक क्षेत्र अधिकारी व्ही. पी. लटारे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)