दोन ड्रम गूळ सडव्यासह १५ लिटर दारू केली नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:13 IST2021-08-02T04:13:30+5:302021-08-02T04:13:30+5:30
आसरअल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंत्तरेवला येथे सहा ते सात अवैध दारूविक्रेत्यांनी नव्याने व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे परिसरातील ...

दोन ड्रम गूळ सडव्यासह १५ लिटर दारू केली नष्ट
आसरअल्ली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंत्तरेवला येथे सहा ते सात अवैध दारूविक्रेत्यांनी नव्याने व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे परिसरातील मद्यपी या गावात दारू पिण्यासाठी येत असतात. गावात हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची माहिती गावसंघटनेने मुक्तिपथ तालुका चमूला दिली. त्यानुसार गाव संघटना व तालुका चमूने अहिंसक कृतीचे नियोजन करून एका दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली. यावेळी त्याच्या घरात १५ लिटर दारू व दोन ड्रम गुळाचा सडवा आढळून आला. जवळपास २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच गावात पुन्हा अवैध दारूविक्री न करण्याबाबत ठणकावून सांगण्यात आले. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू व गावसंघटनेचे सदस्य उपस्थित होते.
010821\01gad_1_01082021_30.jpg
गावसंघटना व मुक्तिपथ चमुने जप्त केलेला गूळ सडवा.