अहेरी कृषी उपविभागात ३८८ कामांसाठी दोन कोटींचा निधी

By Admin | Updated: March 5, 2016 01:21 IST2016-03-05T01:21:44+5:302016-03-05T01:21:44+5:30

उपविभागीय कृषी कार्यालय अहेरीअंतर्गत अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील ६२७ गावांकरिता ३८८ कामे उपलब्ध करण्यात आली आहे.

Two crore fund for 388 works in Aheri Agriculture Subdivision | अहेरी कृषी उपविभागात ३८८ कामांसाठी दोन कोटींचा निधी

अहेरी कृषी उपविभागात ३८८ कामांसाठी दोन कोटींचा निधी

विविध कामे उपलब्ध : चार तालुक्यातील ६२७ गावांना मिळाले काम
अहेरी : उपविभागीय कृषी कार्यालय अहेरीअंतर्गत अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील ६२७ गावांकरिता ३८८ कामे उपलब्ध करण्यात आली आहे. या कामांकरिता शासनाकडून २ कोटी १६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
अहेरी उपविभागीय कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या दुर्गम, अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना बोडी, मजगी, शेततळे, माती नाल्याचे बांधकाम करण्याकरिता निधी प्राप्त झाला आहे. एकूणच ३८८ कामांना मंजुरीसह निधी प्राप्त झाला आहे. २५ आॅक्टोबर २०१५ पासून या कामांची सुरुवात करण्यात आली असल्याची प्रशासकीय माहिती आहे. अहेरी उपविभागातील चार तालुक्यांमध्ये कृषी विभागामार्फत ३८८ कामे उपलब्ध करून निधी प्राप्त झाल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two crore fund for 388 works in Aheri Agriculture Subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.