दोन स्वस्त धान्य दुकानदारांचा सत्कार
By Admin | Updated: January 31, 2017 02:07 IST2017-01-31T02:07:33+5:302017-01-31T02:07:33+5:30
पुरवठा विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथील के. एन. सालोटकर व गोकुलनगर

दोन स्वस्त धान्य दुकानदारांचा सत्कार
ई-पॉज मशीनचा यशस्वी वापर : प्रधान सचिवांनी केला गौरव
गडचिरोली : पुरवठा विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथील के. एन. सालोटकर व गोकुलनगर येथील एन. पी. वैद्यवार या दोन स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉज मशीन देण्यात आल्या आहेत. त्यांनी यशस्वीरित्या या मशीनचा वापर केल्याबद्दल नागपूर येथील आढावा बैठकीदरम्यान त्यांचा राज्याच्या अन्न पुरवठा विभागाचे प्रधानसचिव महेश पाठक यांंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अन्न, धान्याच्या पारदर्शक वितरणासाठी तसेच रोखरहित महाराष्ट्र निर्मितीसाठी पुरवठा विभागाच्या वतीने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉज मशीन वितरित केले आहेत. याचा आढावा नागपूर येथील बचत भवनात २८ जानेवारी रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी घेतला. या कार्यक्रमादरम्यान सालोटकर व वैद्यवार यांचा सत्कार करण्यात आला. राज्यभरात ८४ स्वस्त धान्य दुकानामध्ये ई-पॉज मशीन बसविण्यात आले आहेत. तर ६४ ठिकाणी ई-पॉज मशीन बसविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पाठक यांनी दिली. बैठकीला पुरठा विभागाचे उपायुक्त रमेश आडे, गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदूरकर उपस्थित होते. ई-पॉज मशीन ट्रान्जेक्शनबेस्ट मॉडेल असल्यामुळे उचल करण्यात आलेला साठा व वितरणात हेराफेरी करता येत नाही. या मशीनच्या सहाय्याने दुकानदारांना सुलभतेने अन्नधान्याचे वितरण व त्याचा हिशोब ठेवता येईल, असे पाठक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)