लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रांसोबत गेलेले येथील दोन भाऊ टिकेपल्ली गावाजवळील प्राणहिता नदीत बुडाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अंधार पडल्यामुळे दोघांचा शोध लागू शकला नाही.चेतन संतोष केळझरकर (२६) व सूरज संतोष केळझरकर (२२) दोघेही रा.वनवसाहत, आलापल्ली अशी या भावंडांची नावे आहेत. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी ते मित्रांसोबत टिकेपल्ली गावाजवळ असलेल्या प्राणहिता नदीवर गेले होते. नदीत आंघोळ करीत असताना दोन भावांपैकी एक जण खोल पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसरा भाऊ गेला असता, तो सुद्धा बुडाला.घटनेनंतर सोबतचे ४-५ युवक गावाकडे आले. त्या दोन्ही भावांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी दोघांचा शोध घेतला जाणार आहे.
गडचिरोलीत दोन सख्खे भाऊ नदीत बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 11:33 IST
वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रांसोबत गेलेले येथील दोन भाऊ टिकेपल्ली गावाजवळील प्राणहिता नदीत बुडाले.
गडचिरोलीत दोन सख्खे भाऊ नदीत बुडाले
ठळक मुद्देवाढदिवसाची पार्टी जिवावर बेतली