चितळाचे मांस बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:34+5:302021-01-13T05:34:34+5:30
विनोद गोपाळा दिवटे (४१) व किशोर ऋषी मैंद (३५) दाेघेही रा. अरसोडा अशी आराेपींची नावे आहेत. विनाेद व किशाेर ...

चितळाचे मांस बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
विनोद गोपाळा दिवटे (४१) व किशोर ऋषी मैंद (३५) दाेघेही रा. अरसोडा अशी आराेपींची नावे आहेत. विनाेद व किशाेर यांच्या घरी चितळाचे मांस असल्याची माहिती क्षेत्र सहायक राजू कुंभारे आणि वनरक्षक दोनाडकर यांना मिळाली. त्यांनी विनाेद दिवटे व किशाेर मैंद यांच्या घराची तपासणी केली असता, त्यांच्या घरी चितळाचे कच्चे मांस आढळून आले. दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चितळाची शिकार कोंढाळा येथील मंगलसिंग जुनी याने केली असल्याची माहिती दिली.
चितळाची शिकार मंगलसिंग जुनी याने रवी येथील जंगलात केली असल्याची शंका निर्माण झाली आहे. विनाेद दिवटे याने मंगलसिंग जुनी याच्याकडून २०० रुपयाला अर्धा किलाे मांस विकत घेतल्याचे सांगितले. मुख्य आरोपी मंगल सिंग जुनी याचा शोध घेतला असता, ताे फरार आहे. दिवटे व मैंद यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. घटनेचा अधिक तपास क्षेत्र सहायक राजू कुंभारे, वनरक्षक दोनाडकर करीत आहेत.