ग्रामपंचायतींच्या १६५३ जागांसाठी सहा तालुक्यातून अडीच हजारांवर नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST2020-12-31T05:00:00+5:302020-12-31T05:00:33+5:30
राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासाठी ३ ते ४ ग्रामपंचायत मिळून एक टेबल अशी व्यवस्था केली होती. एकेक उमेदवार संबंधित टेबलवर जाऊन आपला अर्ज देत होता.

ग्रामपंचायतींच्या १६५३ जागांसाठी सहा तालुक्यातून अडीच हजारांवर नामांकन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक होऊ घातलेल्या जिल्ह्याच्या उत्तर भागातील ६ तालुक्यात नामांकन दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे संबंधित तहसील कार्यालयात एकच गर्दी उसळली. विशेष म्हणजे रात्री ९ वाजताही अर्जांची तपासणी करून ते स्वीकारण्याचे काम सुरूच होते.गडचिरोलीसह देसाईगंज, आरमोरी, धानोरा, कुरखेडा आणि कोरची या तालुक्यांमधील १९९ ग्रामपंचायतमधील १६५३ जागांकरिता सदर नामांकन भरण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत २३७० अर्ज स्वीकारले होते. पूर्ण अर्ज स्वीकारण्यासाठी ११ वाजण्याची शक्यता तलसिल कार्यालयाच्या सुत्रांनी व्यक्त केली.
राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासाठी ३ ते ४ ग्रामपंचायत मिळून एक टेबल अशी व्यवस्था केली होती. एकेक उमेदवार संबंधित टेबलवर जाऊन आपला अर्ज देत होता. त्या टेबलवरील कर्मचारी अर्जाची तपासणी करून त्यातील त्रृटी काय आहेत त्या सांगून तो अर्ज स्वीकारत होते. त्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती.
विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात जेवढे अर्ज आले त्यापेक्षा जास्त अर्ज शेवटच्या दिवशी आल्याने रात्री ९ वाजतानंतरही सायंकाळी ५.३० वाजता कार्यालयाच्या आवारात असलेल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरूच होते.
नामांकन दाखल केलेल्या इच्छुाकांच्या अर्जातील त्रुटी गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या आधी दूर करून अर्ज परिपूर्ण करावे लागणार आहे.
आज अर्जांची छाननी, १५ ला मतदान
पहिल्या टप्प्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यात ६ तालुक्यांचा समावेश आहे. गुरूवारी (दि.३१) सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी सुरू होईल. त्यात किती अर्ज वैध आणि किती बाद झाले हे निश्चित होईल. त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजतानंतर रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे.