शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

आरमोरीत २४ तासांत दोन अपघात, तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 13:40 IST

गाय हाकलण्यास गेलेल्या पानटपरी चालकास जोराची धडक: दुचाकी झाडावर धडकल्याने दोघांनी गमावले प्राण

आरमोरी (गडचिरोली): येथे २४ तासांत दोन वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार झाले. शहरातील बर्डी येथे गाय हाकलण्यास गेलेल्या पानटपरी चालकास भरधाव दुचाकीने धडक दिली, यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातातगडचिरोली रोडवर झाडावर दुचाकी आदळून दोन मित्रांनी आपले प्राण गमावले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरमोरीतील बर्डी येथे संतोष प्रभाकर रामपूरकर (४७) यांचे घर आहे. या घरामध्येच त्यांची पानटपरी आहे. १६ ऑगस्टला रात्री दहा वाजता ब्रह्मपुरीहून आरमोरीकडे येणाऱ्या दुचाकीने (एमएच ३६ वाय- ३५९२) त्यांना पानटपरीसमोर जोराची धडक दिली, यात ते गंभीर जखमी झाले, तर दुचाकीवरील किशोर विजय मताने (वय २६, रा.एटापल्ली) व विजय देवराव गावडे(२७, रा.धानोरा) हेही रस्त्यावर आदळल्याने डोक्याला दुखापत झाली. या दोघांवर आरमोरी रुग्णालयात उपचार सुरू असून, संतोष रामपूरकर यांच्यावर ब्रह्मपुरी येथे उपचार सुरू असताना, १८ ऑगस्टला सकाळी दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

दुसरा अपघात आरमोरी-गडचिरोली रोडवरील एका लॉन्ससमोर १७ ऑगस्टला रात्री दहा वाजता झाला. भरधाव दुचाकी (एमएच ३३ झेड-८५३३) लॉनजवळ झाडावर आदळली. यात सोमदल शामराव खांडकुरे (वय २८, रा.इंजेवारी ता.आरमोरी) व सुनील नामदेव बनपूरकर (वय ५०, रा.देऊळगाव, ता.आरमोरी) हे दोघे ठार झाले. ते दोघे देऊळगाव येथून आरमोरीकडे जात होते, ताबा सुटल्याने दुचाकी झाडावर आदळल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

वडिलांना आराम करा म्हटले अन् अर्ध्या तासातच...

आरमोरीतील बर्डी भागात झालेल्या अपघातातील मयत संतोष रामपूरकर (४७) हे रात्री साडेनऊ वाजता घरातून पानटपरीत आले. वडील प्रभाकर यांना तुम्ही आराम करा, असे म्हणून घरी पाठविले व स्वत: पानटपरीत बसले. अर्ध्या तासानंतर पानपटरीसमोर फिरस्ती गाय आली. तिला हाकलण्यासाठी ते पानटपरीतून बाहेर आले. याच वेळी ब्रह्मपुरीहून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली