वाहनासह अडीच लाखांचा दारूसाठा पकडला
By Admin | Updated: April 25, 2016 01:14 IST2016-04-25T01:14:28+5:302016-04-25T01:14:28+5:30
चारचाकी वाहनातून देसाईगंज शहरात दारूची आयात होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा दारूबंदी ...

वाहनासह अडीच लाखांचा दारूसाठा पकडला
दारूबंदी पथकाची कारवाई : देसाईगंजात वाहनातून उतरविली जात होती दारू
देसाईगंज : चारचाकी वाहनातून देसाईगंज शहरात दारूची आयात होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी रविवारी देसाईगंज शहरात धाड टाकून चारचाकी वाहनासह अडीच लाख रूपयांचा दारूसाठा पकडला.
या प्रकरणी पोलिसांनी दारू विक्रेते आरोपी राकेश मारोतराव राखडे, विजय उर्फ चिंटू गजानन संचेती व रंजना धनराज बनकर या तिघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी यांच्याकडील एमएच ३३-४३३७ क्रमांकाचे चारचाकी वाहन जप्त केले. त्यांच्याकडून देशी, विदेशी मिळून एकूण ६२ हजार ३५० रूपयांची दारू जप्त केली. पोलिसांनी आरोपींविरोधात देसाईगंज पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस हवालदार राजू उराडे, पवार, राठोड, ढवळे, चवारे, कुंडगिर यांनी केली. (वार्ताहर)
२१ हजार ५०० रूपयांची दारू जप्त
कन्नमवार वॉर्डातून जिल्हा दारूबंदी पथकाने रविवारी धाड टाकून २१ हजार ५०० रूपयांचा दारूसाठा जप्त केला. भावना महेश लालवानी व रेखा नरेश कुकरेजा असे दारू विक्रेत्या महिला आरोपींची नावे आहेत. १२ हजार रूपये किमतीच्या ९० एमएल मापाच्या २४० निपा, ६ हजार रूपये किमतीच्या ९० एमएलच्या देशी दारूच्या १२० निपा, १ हजार ५०० रूपये किमतीच्या १८० एमएलच्या ६ निपा, २ हजार रूपये किमतीच्या ६५० एमएलच्या १० निपा असा एकूण २१ हजार ५०० रूपयांचा दारूसाठा जप्त केला.