वीस रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:36 IST2021-04-18T04:36:39+5:302021-04-18T04:36:39+5:30
गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासह देसाईगंज तालुक्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या लक्षात घेता परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली ...

वीस रक्तदात्यांनी केले रक्तदान
गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयासह देसाईगंज तालुक्यात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या लक्षात घेता परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. अशात गंभीर रुग्णांना, गर्भवती महिलांना रक्ताची गरज भासू शकते. मात्र रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद सपाटे, शहर अध्यक्ष दीपक नागदेवे, कार्यकर्ते मनोज ढोरे, अनिल साधवानी, भारत दहलानी, सुनील वाधवानी, प्रमोद दहिवले आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रक्त संकलनासाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणय कोसे, पी.डी.लोहारे, जीवन गेडाम, सतीश तडकलावार, परिचारिका लाडे, सुरज चांदेकर यांनी सहकार्य केले. दरम्यान रक्तदात्यांना ऑक्सिजन मशीन, प्रशस्तीपत्र व मास्कचे वितरण करण्यात आले.