विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यूू

By Admin | Updated: August 24, 2016 02:13 IST2016-08-24T02:13:12+5:302016-08-24T02:13:12+5:30

तालुक्यातील देऊळगाव येथील लोहखदानीतून मोटारपंपने शेतीला पाणीपुरवठा करताना विजेचा शॉक लागल्याने देऊळगाव येथील

Turn the laborer to the electric shock | विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यूू

विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यूू

देऊळगावातील घटना : मोटारपंपाद्वारे शेतीला पाणी करताना घात
आरमोरी : तालुक्यातील देऊळगाव येथील लोहखदानीतून मोटारपंपने शेतीला पाणीपुरवठा करताना विजेचा शॉक लागल्याने देऊळगाव येथील तुळशिदास गणपत पाथर (५०) या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
आरमोरी-गडचिरोली मार्गावरील देऊळगाव येथे रस्त्यालगत अब्दुल गफ्फार शकूर रंगुनवाला यांच्या मालकीची लोहखदान आहे. या लोहखदानीमध्ये बोडीसारखा मोठा खोल खड्डा आहे. या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या खड्ड्याच्या किनाऱ्यावर मोटारपंप लावून शेतीला पाणी करीत असताना विजेचा शॉक लागल्याने तुळशिदास गणपत पाथर या मजुराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मृतकाचा भाऊ दामोदर गणपत पाथर यांनी आरमोरी पोलिसांना दिली. आरमोरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एजाज पठाण व पोलीस हवालदार नरोटे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी येथे पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Turn the laborer to the electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.