बनपूरकरांचे घर जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: July 5, 2015 01:37 IST2015-07-05T01:37:52+5:302015-07-05T01:37:52+5:30

दोन दिवसांपूर्वी भरत बनपूरकर यांच्या कृषी केंद्राला आग लागून १० लाखांची हानी झाली होती.

Trying to burn Banpurkar's house | बनपूरकरांचे घर जाळण्याचा प्रयत्न

बनपूरकरांचे घर जाळण्याचा प्रयत्न

कुरखेड्यातील घटना : दोन दिवसांपूर्वी दुकानाला लागली होती आग
कुरखेडा : दोन दिवसांपूर्वी भरत बनपूरकर यांच्या कृषी केंद्राला आग लागून १० लाखांची हानी झाली होती. या प्रकरणी घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली होती. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास आझाद वार्डातील बनपूरकर यांच्या घरात असलेल्या गोठ्यातील तणसीला आग लागून अचानक मोठा धूर निघण्यास सुरूवात झाली.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. गुरूवारी बनपूरकर यांच्या गजानन कृषी केंद्राला आग लागली होती. त्यानंतर शनिवारी त्यांच्या घरातील गोठ्यातील तणसीला आग लावल्या घटना घडली. गोठ्यातून धूराचे लोट दिसताच गुड्डू नैताम, देवदास बंजर, गुड्डू मिस्त्री, फिरोज मिस्त्री, गोलू बेहार, शमीन शेख, अनोप ठलाल आदींनी घटनास्थळी धाव घेतली व मोटारपंपाच्या सहाय्याने आग विझविली. अन्यथा बनपूरकर यांचे घरही पेटले असते. बनपूरकर कुटुंबाला वारंवार धमक्यांच्या चिठ्ठ्या येत असल्याची माहिती भरत बनपुरकर यांनी पोलिसांना दिली आहे, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Trying to burn Banpurkar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.