स्पर्धेत टिकण्यासाठी परिश्रम करा

By Admin | Updated: February 22, 2016 01:42 IST2016-02-22T01:42:28+5:302016-02-22T01:42:28+5:30

स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरिता युवकांनी अधिकाधिक वेळ अभ्यासात घालवावा, मिळालेल्या संधीचे सोने करावे,

Try to stay in the competition | स्पर्धेत टिकण्यासाठी परिश्रम करा

स्पर्धेत टिकण्यासाठी परिश्रम करा

प्रणय अशोक : अहेरी प्रशिक्षणार्थ्यांना पुस्तक वाटप
अहेरी : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याकरिता युवकांनी अधिकाधिक वेळ अभ्यासात घालवावा, मिळालेल्या संधीचे सोने करावे, स्पर्धेत टिकून राहण्याकरिता परिश्रम करावे, असे आवाहन अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी केले.
अहेरी येथे पोलीस प्रशासनातर्फे युवक- युवतींना दिल्या जाणाऱ्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना प्रणय अशोक बोलत होते. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश धुमाळ, अहेरीचे ठाणेदास संजय मोरे, आष्टीचे ठाणेदास उमेश बेसरकर, रोमित तोंबर्लावार, विवेक बेझलवार, रंगय्या रेपाकवार उपस्थित होते.
महिनाभरापासून २०० युवक- युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे. यापैकी १०० प्रशिक्षणार्थी अनिवासी आहेत. या प्रशिक्षणार्थ्यांची निवास व भोजनाची व्यवस्थाही प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. यासह त्यांना भरतीपूर्व बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षणही दिले जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत त्यांना माहिती व्हावी, या हेतूने प्रशासनाकडून स्पर्धा परीक्षेचे पुस्तकही मोफत कार्यक्रमात करण्यात आले. पोलीस व जनता यांच्या सुसंवाद निर्माण होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा, युवकांनी वाममार्ग सोडून पोलीस दलात भरती व्हावे हा उद्देश आहे, असे प्रतिपादन एसडीपीओ धुमाळ यांनी केले. प्रास्ताविक मोरे, संचालन चामे तर आभार सिंग यांनी मानले (शहर प्रतिनिधी)

Web Title: Try to stay in the competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.