विकास कामांची गती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:47 IST2017-08-25T00:45:50+5:302017-08-25T00:47:01+5:30
कामाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासत विकासाची कामे गतीने व वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले.

विकास कामांची गती कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कामाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासत विकासाची कामे गतीने व वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, समिती सदस्य रेखा डोळस, बाबुराव कोहळे, डी.के. मेश्राम, सुधाकर नाईक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. जवळेकर, उपजिल्हाधिकारी चौधरी उपस्थित होते.
जिल्हाभरात एकूण १५७४ अंगणवाड्या आहेत. यातील काही अंगणवाड्यांचे छत गळते. सर्व अंगणवाड्यांना खोली बांधून देण्याबाबत जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी कृषी कर्ज व पीक विमा याबाबत सहकार्य करीत नाही, अशी तक्रार समिती सदस्य बाबुराव कोहळे यांनी केली असता, सर्व बँक अधिकाºयांची जिल्हास्तरावर बैठक घेण्यात येईल, प्रत्येक शाखानिहाय पीक कर्जाचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नायक यांनी दिली.
यावेळी चामोर्शी येथील दिगंबर धानोरकर, ममता बिश्वास, देसाईगंज पं. स. मोहन गायकवाड, धानोरा पं. स. सभापती अजमन राऊत, गडचिरोली पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे, चामोर्शी पं. स. सभापती आनंद भांडेकर, मुलचेरा पं. स. सभापती सुवर्णा येमुलवार, एटापल्ली पं. स. च्या सभापती बेबी लेकामी, अहेरी पं. स. सभापती रेखा आलाम हे उपस्थित होते.
गडचिरोली-मूल सिमेंंट रस्त्याचे काम लवकरच
गडचिरोली ते मूल हा ४० किमीचा सिमेंट रस्ता तयार केला जाणार आहे. याबाबत संबंधितांना कार्यादेश देण्यात आले आहेत. या मार्गालगत असलेल्या विद्युत वाहिन्या हटविण्याचे काम पहिल्या टप्प्यात होणार आहे. गडचिरोली-आष्टी हा रस्ता सुद्धा याच पद्धतीने बांधला जाणार आहे. साकोली-देसाईगंज सिमेंट मार्गाचे काम सुरू झाले आहे. हा रस्ता आरमोरीनंतर येणार आहे. त्यानंतर थेट त्याचे बांधकाम गडचिरोलीपर्यंत केले जाणार आहे, अशी माहिती बैठकीत अधिकाºयांनी सादर केली.