शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे नेणारा ट्रक पकडला

By admin | Updated: July 21, 2014 23:51 IST

चामोर्शी तालुक्यातील दर्शनीमाल परिसरातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या मॅक्स पीकअप वाहनाला गडचिरोली पोलिसांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयासमोर पकडल्याची घटना रविवारी

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील दर्शनीमाल परिसरातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या मॅक्स पीकअप वाहनाला गडचिरोली पोलिसांनी गोंडवाना सैनिकी विद्यालयासमोर पकडल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेसंदर्भात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख रियान शेख नजिद (२६) रा. कलगाव ता. दिग्रस, जि. यवतमाळ असे आहे. प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील कलगाव येथील रहिवासी शेख रियान शेख नजिद व इरफान उद्दीन हे दोघे जण दर्शनीमाल परिसरातील जनावरांना एमएच २९ एम १४३० या मॅक्स पीकअप वाहनाने चामोर्शी मार्गे गडचिरोलीवरून यवतमाळकडे जात होते. दरम्यान काँग्रेसचे गडचिरोली विधानसभा प्रमुख अतुल मल्लेलवार व शहर अध्यक्ष सुनिल डोगरा यांच्या मजुरांनी या घटनेची माहिती त्यांना दिली. त्यांनी लागलीच चामोर्शी मार्गावर धाव घेऊन जनावरे घेऊन जाणाऱ्या मॅक्स पीकअप वाहनाला गोंडवाना सैनिकी विद्यालयासमोर अडविले व या दोघांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच लगेच गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक वाघ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेतली. जनावरांसह ट्रक जप्त केला. तसेच ट्रक चालक आरोपी शेख रियान शेख नजिद याला अटक केली. दुसरा आरोपी इरफान उद्दीन हा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी या दोनही आरोपींवर जनावरांना निर्दयीपणे वागणूक प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ११ (१) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. या ट्रकमध्ये ६ गायी व १ बैल असे ४० हजार रूपयाचे सात जनावरे होती. यापैकी दोन जनावरे मृत्यूमुखी पावल्याची माहिती आहे. पोलिसांनी उर्वरित पाच जनावरे कोंडवाड्यात टाकली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)