अशोक सिंघल यांना श्रद्धांजली
By Admin | Updated: November 20, 2015 01:57 IST2015-11-20T01:57:06+5:302015-11-20T01:57:06+5:30
विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी याकरिता ....

अशोक सिंघल यांना श्रद्धांजली
आरमोरी, रांगी येथे शोकसभा : विश्व हिंदू परिषद व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित
आरमोरी/ रांगी : विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी याकरिता आरमोरी व रांगी येथे शोकसभा घेऊन कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
आरमोरी येथे इंदिरा गांधी चौकात शोकसभा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव कुंभारे होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भारत बावनथडे, पंकज खरवडे, अंकुश खरवडे, भाजप प्रदेश सदस्य रवींद्र बावनथडे, प्रफुल ठवकर, सुशिल पोरेड्डीवार, मनोज मने, नंदू नाकतोडे, नितीन जोध, चंदू आकरे, गोलू वाघरे, मयूर बेहरे, राकेश बेहरे, सचिन बेहरे, रूपेश बेहरे, बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन गणेश बैरवार यांनी केले.
धानोरा तालुक्यातील रांगी येथे शोकसभा आयोजित करून अशोक सिंघल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत साळवे होते. कार्यक्रमाला उपसरपंच नरेंद्र भुरसे, देवराव कुनघाडकर, गांधीजी कुकुडकार, अनंता चापळे, जगन्नाथ चापळे, नंदू हेमके, विलास भोयर, घनश्याम बावणे, दिनेश चापळे, ठुमराज कुकुडकार, आनंदराव पदा, श्रावण देशपांडे, हरी वालदे, विश्वनाथ चापळे, संजय गडपायले, नितीन कावळे, नंदू कुनघाडकर, शामराव बोरसरे, चरण भुरसे, नामदेव बैस उपस्थित होते. यावेळी शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. (प्रतिनिधी)