एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

By Admin | Updated: July 30, 2015 01:23 IST2015-07-30T01:23:06+5:302015-07-30T01:23:06+5:30

धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ, ..

Tribute to APJ Abdul Kalam | एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

मान्यवरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना : शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयात कार्यक्रम
गडचिरोली : धर्मनिरपेक्षतेचे मूर्तीमंत प्रतीक आणि अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे अणुशास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी निधन झाले. मंगळवारी या महान नेत्याला गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, गडचिरोली - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व केरळचे माजी राज्यपाल रा. सु. गवई यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. कलाम व रा. सु. गवई यांच्या प्रतिमेला हार व फुले अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, पंकज गुड्डेवार, पांडुरंग घोटेकर, प्रभाकर वासेकर, समशेर खॉ पठाण, काशिनाथ भडके, नंदू वाईलकर, अमिता मडावी, पी. टी. मसराम, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, बालू मडावी, गौरव कुळमेथे, सुरेश परचाके, विनायक वाढीवा व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. कलाम यांच्या निधनाने देशाने प्रभावशाली व्यक्तिमत्त्व गमावला, अशी प्रतिक्रिया जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष भावना वानखेडे यांनी व्यक्त केली.
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अहेरी - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन झाल्याने अहेरी पाणीपुरवठा उपविभागाच्या वतीने त्यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता अश्विन झाडे, कनिष्ठ अभियंता अमोल रामटेके, प्रवीण झाडे, पंकज मेश्राम, उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार देवानंद सुरपाम उपस्थित होते.
वसंत विद्यालय, गडचिरोली - स्थानिक वसंत विद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक एस. व्ही. लाकडे, शिक्षक कुमरे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, आरमोरी - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष गोविंद राजन कवंडर, विभागप्रमुख विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर, निर्मला भोसले, हर्षराज सहारे, निर्मला नेऊलकर, शारदा मेंघरे, प्रभा मोटघरे, झासी इंदूरकर, माधुरी भोयर, सिंधू म्हशाखेत्री, कुमता घोडेस्वार, एन. एन. मालाकर, सुजाता मेहर, मिनाज शेख, तेजेश्वर भोयर, रवीकांत म्हस्के, सरिता सातपुते, किरण रामटेके, नईमा पठाण, राधिका बेहरे, देबरथ मंडल, रतनराज खोब्रागडे, पुष्पा कुंभारे, दाळींबा उंदीरवाडे, शालू बारापात्रे अनिता कोल्हे, रत्ना खापर्डे उपस्थित होत्या.
लिटिल फ्लॉवर स्कूल, वसाचक - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना शाळेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य फादर कुरीयन, एन्जकसी, फ्रिन्सी, दीपाली झोडगे, मीनाक्षी सुरनकर, ममता बांबोळे, मनोज भानारकर, रवींद्र सेलोटे, एकनाथ खोबरे उपस्थित होते.
राजे धर्मराव कला, वाणिज्य महाविद्यालय, मुलचेरा - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्राचार्य प्रकाश मेश्राम, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पोटेगाव - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक जी. सी. खांडवाये, सुधीर शेंडे, एस. एल. पडवेकर, ए. डब्ल्यू. बोरकर, नलिनी कुमरे, बी. डी. वाळके, के. जी. भोसरे, व्ही. एम. बनगीनवार, के. जी. गेडाम, व्ही. एम. नैताम, व्ही. एस. देसू, एम. जी. वासेकर उपस्थित होते. डॉ. कलाम यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली - श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. जे. गावंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. इन्कणे, प्रा. साखरे, प्रा. दुर्गम, प्रा. कोयलवार, गडसुलवार, चंद्रकांत शेटे, वाटेकर, प्रवीण कांबळे, विनोद रोहणकर, राकेश संतोषवार उपस्थित होते.
संजीवनी प्राथमिक शाळा, विवेकानंदनगर, गडचिरोली - माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सचिन भुरसे होते. यावेळी दोन मिनीटे मौन पाळून डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली. संचालन पवन संतोषवार तर आभार शुभांगी रामटेके यांनी मानले.

Web Title: Tribute to APJ Abdul Kalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.